मोडी वाचन म्हणजे इतिसाचा मागोवा आणि भविष्याचा कानोसा आहे. यादवकाल ते आंग्लकाल मोडी लिपीतील मजकूर लिहिणाऱ्यांची भाषा उर्दू, फारशी, इंग्रजीमिश्रीत मराठी असून ती बऱ्याच ठिकाणी अशुद्ध असली तरी ओजस्वी आहे. सरकारने मोडी अभ्यासक्रमात आणून अनेक अज्ञात दस्तऐवजांवर प्रकाश पाडून संशोधनाचे नवे दालन सुरू करावे.
स्वतःला शिवरायांचे पाईक मानणाऱ्यांनी शिवरायांची राजनीती, युद्धनीती व न्यायनीतीचा सखोल अभ्यास व चिंतन केले, तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मराठ्यांची सत्ता अटकेपार तर जाईलच, शिवाय आपापसातील यादवी संपुष्टात येऊन माणुसकीचा, सुसंस्कृत समाजाचा आदर्श निश्चितच समाजापुढे उभा करता येईल. आज शिवरायांची अशी असंख्य आज्ञापत्रे, हुकूमनामे, न्यायनिवाडे, मुद्रा, आपल्याला विविध प्रकारची माहिती देऊ शकतात; मात्र हे सर्व लिखाण, मोडी लिपीत असल्याने या लिपीच्या जाणकारांची आदर्श समाजउभारणीच्या कार्यासाठी गरज आहे. शिवरायांच्या चरित्राची, त्यांच्या कार्याची वस्तुनिष्ठ व निःपक्षपाती भूमिका जेव्हा समाजापुढे येईल तेव्हा आमच्या राज्यकर्त्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्यातील कुपमंडुक वृत्तीचे केवळ ज्ञान होऊन समाजविधायक कार्य पुन्हा उभे करता येईल.
मोडी वाचन म्हणजे इतिसाचा मागोवा आणि भविष्याचा कानोसा आहे. यादवकाल ते आंग्लकाल मोडी लिपीतील मजकूर लिहिणाऱ्यांची भाषा उर्दू, फारशी, इंग्रजीमिश्रीत मराठी असून ती बऱ्याच ठिकाणी अशुद्ध असली तरी ओजस्वी आहे.व्याकरणाच्या दृष्टीने हिचा तोंडवळा तिच्या वडीलबहिणीप्रमाणेच असावा यात आश्चर्य नाही आणि या अभयान्वये अव्ययाने वाक्यांचा प्रारंभ होणे, कर्त्यावाचून वाक्यरचना, क्रियापदावाचून वाक्य, तृतीयान्त कर्त्याचे वाक्य कर्तरी प्रयोगात समाप्त होणे, इ. भिन्न भिन्न प्रयोग या यादवकालीन कागदपत्रात आढळतात. त्या वेळी मराठी व्याकरणशास्त्राचे अस्तित्व नसल्याने याला भाषादोष म्हणता येईल की काय याची शंका वाटते. याच्या उलट इतिहासकालीन मराठी लेखनाचा हा विशेष समजणे योग्य होईल.शक्ती शक्ती म्हणतात ती काही केवळ अक्षरांच्या चित्रविचित्र आकृतीत नसते, तर तिचा वास त्या आकृत्यांचा लिपी म्हणून वापर करणाऱ्यांच्या मनात आणि मनगटात असावा लागतो. त्या जोरावरच यादवकालापासून सर्व पत्रव्यवहार मोडी लिपीतूनच चालत असे. यादवांचा प्रधान हेमांडपंत नावाचा एक विद्वान गृहस्थ होता. त्याने मोडी लिपीला अधिक चालना मिळवून दिली. त्यांची स्मृती या मोडी लिपीने जागृत ठेवली आहे.
शहाजीराजांच्या काळातील मोडी लिपीवर उर्दूचा व फारसीचा प्रभाव जाणवतो. मोडी लिपी ही अधिक विकसित झाली ती याच काळात. शिरोरेघ आखून कागदाच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हात न उचलता सलग आणि जलद लिहीत जाणे हे मोडीचे वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यामुळे व्यक्तीनुसार मोडी अक्षर बदलत असे. शिवकाळात बाळाजी आवजी व पेशवेकाळात चिटणीसी मोडी देखणी व सुवाच्च होती.मोडी लिपी वाचणे, लिहिणे आले म्हणजे सर्व आले असे नसून त्यातील सौंदर्यस्थळांचा शोध आणि बोध त्रोटक स्वरूपाने घ्यावा लागतो. त्यासाठी-1. विविध कालगणना ः कालमापन करणे म्हणजे काल मोजणे. ऐतिहासिक कागदपत्रांतून विविध प्रकारच्या कालगणना किंवा सनावळ्या असतात. इंग्रजी किंवा मराठी कालगणना ज्याप्रमाणे आकड्यांतून मांडण्याची पद्धत आहे, तसा प्रकार जुन्या कागदपत्रांतून उल्लेखिलेल्या सुहूर किंवा अरबी समानसंबंधी नाही. तो सन शब्दात लिहीत. मोडी लिपीच्या जुन्या कागदपत्रांत इसवीसन किंवा जानेवारी, फेब्रुवारी वगैरे महिने नसतात. त्यांच्या जागी चैत्र, वैशाख इ. मराठी किंवा मोहरम, सफर इ. मुसलमानी महिन्यांची नावे आणि शालिवाहन शक, राज्याभिषेक शक किंवा सुहूर, फसली, जुलूस हिजरी सन इ. कालगणनेचे आकडे आढळतात.2. मायना ः ऐतिहासिक पत्रलेखन हे एक इतिहास अभ्यासाचे अव्वल दर्जाचे साधन आहे. पत्राच्या प्रारंभी लिहावयाचा मजकूर या अर्थाने हा शब्द वापरला जात आहे. पत्राच्या सुरुवातीला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला गौरवून लिहिण्याचा प्रघात होता. त्या व्यक्तीला असलेला सन्मान, त्या व्यक्तीचे खास वैशिष्ट्य, त्याला दिलेली पदवी अथवा त्याचे असलेले सामाजिक स्थान या गोष्टींचा विचार करून त्या व्यक्तीच्या नावापूर्वी जो मजकूर आपण पत्राच्या प्रारंभी लिहितो त्याला मायना असे म्हणतात.
पत्र कोणास कोणी लिहिले आहे, त्यावर मायना अवलंबून असतो. पत्र समाप्तीचा मायना हासुद्धा पत्रलेखक आणि वाचक यांचा सामाजिक दर्जा, वय, संबंध इ. वर अवलंबून असतो. मोडी लिपीतील पत्रांचे मायने डौलदार भाषाशैलीत आढळतात. उदा. स्वस्ती श्री राज्याभिषेक शक... क्षत्रिय कुलावतांत श्रीराजा शिवछत्रपती यांनी आज्ञा केली अैसी जे, श्रीमंत उत्तमगुण परिपूर्ण अखंडित लक्ष्मी प्रसन्न राजमान्य राजश्री गोसावी या मायन्यातून अर्थाचे सामान्यीकरण होऊन पत्रातील मजकुरालाही पुढे मायना हाच शब्द वापरला जाऊ लागला. या मायन्यात पत्रग्राहक वा प्रेषक आपला परिचय करून देत असे."हेमाडपंती मेस्तके' या स्वतंत्र प्रकरणात लेखनाचे मायने दिले आहेत. राज्य कारभारविषयक पत्रलेखन विशिष्ट नियमानुसार मोडी लिपीतच असे.3. रेघी मांडणी ः सातशे वर्षांपूर्वीचा माणूस ढोबळपणे बोलत असे. उदा. ती आळी हाळीच्या अंतरावर आहे. नजरेच्या टप्प्यात टेकाडी आहे. पुरुषभर उंचीएवढे पाणी आहे. बचकभर दाणे, चिमूटभर मीठ, दोन खग अंतर वगैरे, चलन, वजन, अंतर यासंबंधी मापन आणि परिमाणे अष्टमान पद्धतीची होती. वजन आणि मापी असाही प्रकार होता. या सर्वांची लिहिण्याची पद्धत मात्र रेघी मांडणीनुसारच केलेली आढळते. क्वचितप्रसंगी नुसत्या आकड्यातही लिहिलेली आढळते.अ. चलन (रकमा लिहिताना).... रुपये, पावल्या, आणे, पैसे किंवा पै.ब. धान्य, काष्ठ, तेल, तूप.... खंडी, मण, पायली, शेरक. सोने, रुपे, चांदी, केसर.... तोळे, मासे, वाल, गुंजाड. जमिनीची मोजणीसाठी.... चावर, बिघा, पांड, काठ्या, एकर, गुंठे, चौ. यार्डइ. कापड (वस्त्र मोजण्यासाठी).... वार, गज, तसू, अंगुळेई. अंतर मोजण्यासाठी.... योजन, कोस, मैल, दंडरेघी मांडणी करताना (6) अशी अळी काढतात. अळी म्हणजे रिक्त स्थान. ज्या वेळी रिक्त स्थान असते तेथे अळीचा उपयोग करतात. तरीसुद्धा तो कोठे कसा करावा हे अभ्यासानेच कळू शकेल.उदा. एक पैसा ते पावणे सोळा आणे असे आण्याच्या भाषेत बोलावे.4. शब्द संक्षेप योजना ः मोडी लिपी जलद लिखाणासाठी जशी लपेटीदार पद्धत वापरली जाते, त्याचप्रमाणे वारंवार वापरात येणारे शब्दसंक्षिप्त स्वरूपात लिहिण्याची वहिवाट आहे. शब्दसंक्षेप हा वाचकाला अत्यंत गोंधळात टाकणारा प्रकार आहे. त्याबाबत निश्चित असा कोणताही नियम नसल्यामुळे हे शब्दसंक्षेप तर्काने किंवा सततच्या अभ्यासाने माहिती करून घ्यावे लागतात.

गेली दहा वर्षे श्री. कृष्णाजी म्हात्रे हे माझे गुरू मोडी लिपीचा प्रचार व्हावा म्हणून मोडी वर्ग चालवत आहेत. या मोडी प्रसाराचे महर्षी कैलासवासी श्री. मनोहर जागुष्ठ्ये सरांचे कार्य म्हात्रे सरांनी अविरत सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुप्रसिद्ध इतिहासकार व मराठ्यांच्या इतिहासाची परंपरा सांगणारे पूजनीय बाबासाहेब पुरंदरे यांनीही म्हात्रे सरांच्या या कार्याची मनापासून दखल घेऊन म्हटले आहे "मराठी लेखणी पुन्हा पैठणी नेसू लागली आहे' (मोडी लिपीला त्यांनी पैठणीची उपमा दिली आहे) महाराष्ट्र सरस्वती नक्षत्रांच्या फुलांनी श्री. म्हात्रे यांची दृष्ट काढील यात शंका नाही.अशा या मोडी लिपीचे महत्त्व ओळखून भारतातील अग्रगण्य विद्यापीठ "यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ' यांनी नुकतेच आपल्या अभ्यासक्रमात मोडीला समाविष्ट करण्याचे ठरविले आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लिपीचे पुनरुज्जीवन महाराष्ट्राच्या नवउभारणीचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री कै. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याच विद्यापीठाने सुरू करून या विद्यापीठाच्या नावाला शोभेल असे कार्य करून दाखविले आहे. यासाठी नुकतेच कार्यभारातून मुक्त झालेल्या कुलगुरू डॉ. श्री. सुधीर गव्हाणे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल. श्री. म्हात्रे सरांच्या अथक परिश्रमाचेच हे मूर्त स्वरूप मानावे लागेल. तसेच, श्री.एम.एन.खिलारी हे विद्यापीठाच्या व्यवस्थापन पदावर असल्याकारणाने हे सर्व घडून आले. तसेच त्यांचे चिरंजीव श्री.राजेश खिलारी यांच्या चिकाटीने त्यांचे वडीलही प्रेरित झाले. माझे सर्व विद्यापीठांना, शाळांना, महाराष्ट्र शिक्षण मंडळाला, राज्य सरकाराला हे नम्र निवेदन आहे, की त्यांनी मोडी ही अभ्यासक्रमात आणून अनेक अज्ञात दस्तऐवजांवर प्रकाश पाडून संशोधनाचे नवे दालन सुरू करावे. म्हणजे अशा संशोधनामुळे आदर्श असा इतिहास समाजापुढे येईल आणि त्यातून पुन्हा एकदा नवसमाजाची निर्मिती होईल यात तीळमात्र शंका नाही.