लोक प्रतिनिधी सुद्धा शिकताहेत ‘मोडी लिपी’
सन
१९५९ मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन बॉम्बे स्टेटच्या खेर मंत्रीमंडळाने
मराठी अस्मिता, संस्कृति आणि इतिहास गेली ९०० वर्ष जपणार्या मोडी लिपीला ‘अनावश्यक’
असे जाहीर करून अधिकृत रित्या तिला लोक व्यवहारातून बहिष्कृत केली. छत्रपति शिवाजी
महाराज आणि एकंदर मराठी साम्राज्याचा इतिहास हा सबंध मोडी लिपीतूनंच लिहीला गेला
आहे. त्यामुळे मराठी इतिहास संशोधनाचे द्वारंच प्रशासनाने कायमचे बंद करून टाकले.
ही भयंकर बाब सर्वप्रथम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण
यांच्या लक्षात आली आणि सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर त्यांनी
लगेच उत्तम मोडी जाणकारांचे मराठी इतिहास संशोधनाकरिता पुढे येण्याचे आव्हान केले.
६ महिने उलटले तरी कोणी पुढे आले नाही. कसे येणार ? मोडी लिपी शिकवणे व त्याचा
वापरंच प्रशासनाने बंद करून टाकला होता ! याचे चव्हाणसाहेबांना फार वाईट वाटले. पण
त्याच दरम्यान एक धक्कादायक परंतु अद्भुत घटना घडली. चव्हाणसाहेबांना जपानच्या टोक्यो
विश्वविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रो.फुकुज़ावा यांचे पत्र आले – “तुम्ही उत्तम मोडी
वाचकांचे आव्हान केल्याची बातमी आमच्या पर्यंत पोहोचली. तुमच्याकडे मोडी वाचक
नसतील तर आम्ही पाठवू का ?” श्री.फुकुज़ावा हे
स्वतः उत्तम मोडी लिपी जाणकार होते. यशवंतराव चव्हाणस दिवंगत झाल्या नंतर रूमाल
नावाच्या कबरीत मोडी पत्र तसेच पडून आहेत. अदमासे ४० कोटी मोडी लिपी दस्तावेज
वाचले जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरवर्षी शेकडो मोडी दस्तावेज नष्ट करावे
लागतात, न वाचताच. वाळवीचा प्रादुर्भाव; शाई विरळ होणे; कागद जिर्ण होणे; उंदराने
कुरतडणे; बुरशी येणे ही त्या मागची कारणे आहेत.
एप्रिल २०१३ मध्ये असेच एका चर्चासत्रात मराठी अस्मितेच्या या दैन्यावस्थेची कथा दादर विभाग, मुंबईचे मनसे नगरसेवक श्री.गिरीष धानुरकर यांनी ऐकली. मराठी भाषेचा आव न आणता किंवा पोकळ भाषणबाजी न करता यांनी थेट स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर पश्चिम येथे जागतिक मोडी लिपी प्रसार समिती तर्फे नियमित घेण्यात येणार्या प्रगत मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. आपला राजकीय परिचय आपल्या कार्यालयात सोडून ते दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोडी लिपीचे प्रशिक्षण घेतात. मोडी लिपी तज्ज्ञ व संशोधक श्री. राजेश खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज तीन महिन्यांनंतर श्री.गिरीष धानुरकर आत्मविश्वासाने धडाधड अस्खलित मोडी पत्रे वाचतात. गेल्या १ महिन्यात त्यांनी तब्बल १२ पेशवेकालीन मोडी पत्रांचे लिप्यंतर केले आहे. सकाळ पासून दुपार पर्यंत महापालीकेत आणि दुपार नंतर त्यांच्या विभागाची कामे मार्गी लावने असा जबर व्यस्त नित्य दिनक्रम असतानाही ते न चूकता विद्यार्थी रूपाने आणि खर्या मराठी अस्मितेने मोडी लिपीचा सराव आणि मोडी पत्रांचे लिप्यंतर करतात. मराठी इतिहास आणि अस्मितेची पोकळ भाषणे न देता या मौल्यवान मराठी धरोहराची आणि दौलतीची जागरूकता मराठी जनमानसात रूजवत आहेत. त्यांच्या सहकार्यांना ते आवर्जुन मोडी लिपी शिकण्यास प्रोत्साहीत करत आहेत. या दिशेने त्यांचे पहिले पाऊल म्हणजे त्यांनी त्यांच्या पत्नीला मोडी लिपी शिकवण्यास प्रारंभ केला आहे. महापलिकेच्या शाळांमधून तरी हा किमान ऐच्छीक विषय अभ्यासक्रामात यावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. प्रशासनाच्या नावे खडे फोडत बसण्यापेक्षा गडकोट भ्रमंती करणारे ट्रेकर्स, शिवजयंती व शिवराज्याभिषेक साजरी करणार्या संस्था, मराठी भाषा आणि इतिहास विषयात एम.ए. करणार्यांनी तर आपली ही मोडी लिपी आवर्जुन शिकलीच पाहिजे. जागतिक मोडी लिपी प्रसार समितीने श्री.राजेश खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली फेसबूक आणि ऑर्कुटच्या इंटरनेट माध्यमातून जगभर जिज्ञासूंना मोडी लिपी शिकवण्यास प्रारंभ केला. अधीक माहितीसाठी खालील दूरध्वनि वर जिज्ञासूंनी संपर्क साधावा.
आज खर्या अर्थाने मोडी लिपी जाणकार झाले पहिले लोक प्रतिनिधी श्री. गिरीष धानुरकर.
Shri.Girish Dhanurkar |
श्री.राजेश खिलारी
Jagtik.modi@gmail.com
९३२३०
२२२२३